Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

चरित्रातले अभंग

 

परिशिष्ट १

 
१.
काहिच मी नव्हे कोणिये गावीचा एकट ठायीचा ठायी एक ।।।।
नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेचि वायाविण बोले ।।।।
नाही मज कोणी आपुले दुसरे । कोणाचा मी खरे काही नव्हे ।।।।
नाहीम्हा ज्यावे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे ।।।।
तुका म्हणे नावरूप नाहीम्हा । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ।।।।

२.
धन्य देहू गाव पुण्य भूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥
धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे । उच्चारिती वाचे नाम घोष ॥धृ॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी॥२॥
गरूड पारी उभा जोडूनिया कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥३॥
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥४॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचे वन । तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर ॥५॥
विघ्नराज द्वारी बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारी सहित दोघे ॥६॥
तेथे दास तुका करितो कीर्तन । ह्रुदयी चरण विठोबाचे॥७॥

३.
पवित्र ते कूळ पावन तो देश । जेथे हरिचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
वर्ण अभिमाने कोण जाले पावन । ऐसे द्या सागून मजपाशी ॥२॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट जाली ॥३॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
कबीर मोमीन लतीब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
कणोपात्र खोदु पिंजारी तो दादू । भजनी अभेदू हरीचे पायी ॥६॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
चोखामेळा बंका जातीचा महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरिराव तियेसवे ॥८॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचे काय सागों ॥९॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतीत नेणों किती ॥११॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु॥

४अ.
हाती होन दावी बेना । करिती लेकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जालेळी । पुण्य रंक पाप बळी ॥ धृ॥
साडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडी । लेती विजारा कातडी ॥३॥
बैसोनिया तक्तां । अन्नेवीण पिडीती लोका ॥४॥
मुदबख लिहिणे । तेलतुपावरी जिणे ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती भार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवे वरी सोग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥

४ब
पाहा हो कलिचे महिमान । असत्त्यासी रिझले जन ।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संताचे ॥१॥
ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।
केले धर्माचे निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥धृ॥
थोर या युगाचे आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
साडुनिया द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ ।
नाही जाली ऐसी नीत । हा हा भूत पातले ॥३॥
शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया ।
ठाव नाही सागावया । सत्त्व धैर्य भंगिले ॥४॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरिती कर्म ।
म्हणविता रामराम । श्रम महा मानिती ॥५॥
थेर भोरपाचे विशी । धावती भूते आविसा तैसी
कथा पुराण म्हणता सिसी । तिडीक उठी नकऱ्याचे ॥६॥
विषय लोभासाटी । सर्वार्थेंसी प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठी । मागता उठती सुनीसी ॥७॥
धनाढ्य़ देखोनि अनामिक । तयाते मानिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । सात्विक शास्त्रद्न्य संपन्न ॥८॥
पुत्र ते पितियापाशी । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥
खोटें जाले आली विंवसी। केली मर्यादा नाहिंसी।
भ्रतारे ती भार्यासी । रंक तैसी मानिती ॥१०॥
नमस्कारावया हरिदासा । लाजती धरिती काही गर्वसा ।
पोटासाठी खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥
बहुत पाप जाले उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।
अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
कैसे जाले नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदने दासिंची चुंबिती।
सोवळ्याच्या स्फ़िती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥
मद्यपानाची सुराणी । नवनीता नपुसे कोणी ।
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता ।
पुण्य धुडावोनी संता । तीर्था हरी आणिती ॥१६॥
भेणे मंद जाल्या मेघवृष्टि । आकातली कापे सृष्टि ।
देव रिगाले कपाटी । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
अपीक धान्ये दिवसे दिवसे । गाई म्हैसी चेवल्या गोरसे
नगरे दिसती उध्वंसे । पिकली बहुवसे पाखांडे ॥१८॥
होम हरपली हवने । यद्न्ययाग अनुष्ठाने
जपतपादि साधने । आचरणे भ्रष्टली ॥१९॥
अठरा यातीचे व्यापार । करिती तस्कराई विप्र ।
साडोनिया शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळी पांघरती ॥२०॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्री ।
अष्वाचिया परि । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयाची ।
आवडी पंडिताची । मुसाफ़ावरी बैसली ॥२२॥
मुख्य सर्वोत्तम साधनेती उच्छेदूनिं केली दीने
कुडी कापटें महा मोहने । मिरविताती दुर्जन ॥२३॥
कळाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदे ठायी
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसी नाडली ॥२४॥
जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होता बैरागी दिगांबर निस्पृही
वैराग्यकारी। कामक्रोधे व्यापिले भारी। इच्छाकरी न सुटती ॥२५॥
कैसे विनाशकाळाचे कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघाते वर्तती ॥२६॥
केवढी ये राडेची अंगवण । भ्रमविले अवघें जन ।
याती अठरा चारी वर्ण । कर्दम करुनी विटाळले ॥२७॥
पूवाअहोते भविष्य केले । संती ते यथार्थ जाले
ऐकत होतो ते देखिले । प्रत्यक्ष लोचनी ॥२८॥
ता असो हे आघवे । गति नव्हे कळीमध्येवागवरावे ।
देवासी भाकोनि करुणावे । वेगे स्मरावे अंतरी ॥२९॥
अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसि या कौतुका ।
धांव कलीने गांजिले लोका । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३० ॥

५अ.
संता नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥धृ॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥

५ब.
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भूत चराचरी
ऐसिया अनंतामाजी तू अनंत । लीलावेश होता जगत्राता ॥१॥
ब्रह्मानंद तुकें तुळे आल तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनी ॥धृ॥
शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियेली ।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिवीण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळी जगधंद्या गिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
संत वृंदे तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली॥३॥
शांति पतिव्रते जाले परिनयन । कामसंतर्पण निष्कामता ।
क्षमा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगीं । ते तो तुझ्या अंगीं मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुव जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूते ॥५॥
अधर्म क्षयव्याधी धर्माशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ति विस्तारिली । वाक्यें सपळ केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धि जात्या अभिमाने वंचलो । तो मी उपेक्षलो न पाहिजे
न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥

६.
अर्भकाचे साटी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगीं । क्रिया करुनि दाविती अंगीं ॥ धृ॥
बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥
तुका म्हणे नांव । जनांसाठीं उदकीं ठाव ॥३॥

७.
ओनाम्याच्या काळे । खडे मांडविले बाळे ॥१॥
तोचि पुढे पुढे काई । मग लागलिया सोई ॥धृ॥
रज्जु सर्प होता । तोवरी चि न कळता ॥२॥
तुका म्हणे साचे । भय नाही बागुलाचे ॥३॥
८.
बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनि ॥१॥
एकाएकीं केलो मिरासीचा धनी । काडिये वागवूनी भार खांदी ॥धृ॥
लेवऊनि पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करुनिया ॥२॥
तुका म्हणे नेदी गांजू आणिकासी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥

९.
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥धृ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥२॥
पोर मेलेरे जाले । देवे मायाविरहित केले ॥३॥
माता मेली मजदेखता । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥

१०.
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ते ॥१॥
काय नाही त्याची करीत ते सेवा । काय नाही जीवा गोमटें ते ॥२॥
अमंगळपणे कंटाळा न धरी । उचलोनि करी कंठीं लावी ॥३॥
लेववी आपुले अंगे अळंकार । संतोषाये फार देखोनिया ॥४॥
तुका म्हणे स्तुति योग्य नाही परी । तुम्म्म्हां लाज थोरी अंकिताची ॥५॥


११.
याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कूळपूज्य ॥१॥
नयें बोलो परि पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संती ॥धृ॥
संवसारे जालो अतिदु़खे दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥
दुष्काळे आटिले द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली।३॥
लज्जा वाटें जीवा त्रासलो या दु:खे । वेवसाय देख तुटी येता ॥४॥
देवाचे देऊळ होते ते भंगले । चित्तासी जेले करावेसे ॥५॥
आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासी चित्त आधीं ।
काही पाठ केली संताची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥७॥
गाती पुढे त्यांचे धरावे धृपद । भावे चित्त शुद्ध करोनिया ॥८॥
संताचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाहीनी ये दिली॥९॥
टाकला तो काही केला उपकार । केले हे शरीर कष्टवूनि ॥१०॥
वचन मानिले नाही सहुदांचे । समूळ प्रपंचे वीट आला ॥११॥
सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कंही पडिला आघात । तेणे मध्यें चित्त दुखविले ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलो धरणे । केले नारायणे समाधान ॥१६॥
विस्तारी साता बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरे ॥१७॥
आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आले ॥१९॥
तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगे ॥२०॥

१२.
ऐका वचन हे संत । मी तो आगळा पतित ।
काय काजे प्रीत । करितसा आदरे ॥१॥
माझे चित्त मज ग्वाही । सत्त्य तरलो मी नाही
एकाचिये वांही । एक देखी मानिती ॥धृ॥
बहू पीडिलो संसारे । मोडी पुसे पिटी ढोरे
न पडता पुरे । या विचारे राहिलो ॥२॥
सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही
त्याग केला नाही दिले द्विजां याचका ॥३॥
प्रियापुत्रबंधु । याचा तोडिला संबंधु ।
सहज जालो मंदु । भाग्यहीन करंटा ॥४॥
तोड न दाखवे जनां । शिरे सादी भरे राणा
कात तो जाणा । तयासाटी लागाला ॥५॥
पोटें पिटिलो काहारे । दया नाही या विचारे
बोलवितारे । सहज म्हणे यासाटी ॥६॥
सहज वडिला होती सेवा । म्हणोनि पूजितो या देवा ।
तुका म्हणे भावा । साटी झणी घ्या कोणी ॥७॥

१३.
संसाराच्या नावे घालूनिया शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
हरिभजने हे धवळिले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥धृ॥
कोणा ही नलगे साधनांचा पांग । करणे केला त्याग देहबुद्धी ॥२॥
तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणे भाववेथा गाईल तो ॥३॥

१४.
विचारिले आधी आपुल्या मानसी । वाचो येथे कैसी कोण्या द्वारे ॥१॥
तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाही ॥धृ॥
उद्वेगाचे होतो पदिलो समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणे दु:खे आल आयुर्भाव । जाला बहू जीव कासावीस ॥३॥


१५.
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥
भंबगिरीपाठारी वस्ती जाण केली । वृत्ती थिरावली परब्रम्ही ॥धृ॥
निर्वाण जाणोनि आसन घातले । ध्यान आरंभिले देवाजीचे ॥२॥
सर्प विन्चू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे ॥४॥

१६.
रू तैसे पाठांतर । करुणाकर भाषण ॥१॥
जिही केला मूर्तीमंत । ऐसे संत प्रसाद ॥धृ॥
सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटां मागीलां ॥२॥
तुका म्हणे घे धांवा । करू हांवा ते जोडी ॥३॥




१७.
तुजवीण कोणा । शरण जा नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । तुजा तिही त्रिभुवनी ॥धृ॥
पाहिली पुराणे । धांडोळिली दरुषणे ॥२॥
तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझ्या पायी ॥३॥

१८.
पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळे फोल कवित्व ॥धृ॥
भावे घ्या रे भावे घ्या रे । एकदा जा रे पंढ्रिये ॥२॥
भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करील झाडा । जाईल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हाती टाळदिंडी । गावे तोडी गुणवाद ॥५॥
तुका म्हणे घटापटा । न लागे वाटा शोधाव्या ॥६॥

१९.
वृक्ष वल्लीं आम्हा सोयरी वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१
येणे सुखे रुचेकाताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करी ॥२॥
कथाकुमंडलु देह उपचारा। जाण्वितो वारा अवश्वरू॥३॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥५॥

२०.
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सावे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सागितकें काम करावे कवित्व । वाउगे निमित्त बोलू नको ॥धृ ॥
माप टाकी सल धरिला विठ्ठले थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सागे शतकोटी । उरले शेवटी लावी तुका॥३॥

२१.
द्याल ठाव तरी राहेन संगती । संताचे पंगती पायापाशी ॥१॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून । आता उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवतील स्थळ निंच माझी वृत्ती । आधारे विश्रंती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥

२२.
सेविता रस तो वाटितो आणिका । घ्या रे होवू नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाऊले समान । तो चि एक दानशूर दाता ॥धृ॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायी ॥२॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥

२३.
बोलावे म्हूण हे बोलतो उपाय । प्रवाहे हे जाय गंगाजळ ॥१॥
भाग्ययोगे कोणा घडेल सेवन । कैचे येथे जन अधिकारी ॥धृ॥
मुखी देता घांस पळविती तोडे । अंगीचिया भांडे असुकाने ॥२॥
तुका म्हणे पूजा करितो देवाची । आपुलिया रुची मनाचियें ॥३॥

२४.
करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझियें युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृ॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेचि वदे ॥२॥
निमित्त मापासी बैसविलो आहे । मी तो काही नव्हे स्वामीसत्ता ॥३॥
तुका म्हणे आहे पाईक मी खरा । वागवितो मुद्रा नमाची हे ॥४॥

२५.
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनिया ॥धृ॥
मज मूढा शक्ति कैचा हा विचार । निगमादिका पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । बोबडा उत्तरी हे चि ध्यान ॥३॥
तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगे भार घेतला माझा ॥४॥


२६.
काय खावेता कोणीकडे जावे । गावांत राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥
ता येणे चवी साडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणात ॥२॥
भल्या लोकीं यास सागितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठ्ला जाऊ आता ॥४॥

२७.
तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणाची खोळ घेऊनि बैसलासी । काय हृषिकेशी जाले तूज ॥धृ॥
तुजवरीता प्राण मी तजीन । हत्त्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणेता मांडिले निर्वाण । प्राण हा साडिन तुजवरी ॥४॥

२८.
थोर अन्याय मी केला तुझा अंत म्या पाहिला | जनाचिया बोलासाटी चित्त क्षोभविले ॥१॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलो ॥धृ॥
अवघें घालुनिया कोडे तानभुकेचे साडे । योग क्षेम पुढे तुज करणे लागेल ॥२॥
उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले ॥३॥



२९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष ते अमृत अघाते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृ॥
दु:ख ते देइल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥२॥
आवडेल जीवां जीवांचे परी । सकळा आंतरी एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणियेते येणे अनुभवे ॥४॥

३०.
काखे कडासन आज पडे । खडबड खडबडे हुसकले ॥१॥
दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाही ॥धृ॥
अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरिदासाच्या पडती पाया । म्हणती तया नागवावे ॥३॥
दोहिं ठायी फजीत जाले । पारणे केले अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिही ॥५॥

३१.
अविट हे क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनी ॥१॥
अमृत राहिले लाजुन माघारे । येणेसे थोरे ब्रह्मानंदे ॥धृ॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥
सर्व सुखे तया मोहोरती ठाया । जेथे वाटणी या वैष्णवांची ॥३॥
निर्गुण हे सोग धरिले गुणवंत । धरूनिया प्रीत गाये नाचे ॥४॥
तुका म्हणे केली साधने गाळणी । सुलभ कीर्तनी होवोनि ठेला ॥५॥

३२.
श्रीपंढरीशा पतित पावना । एक विज्ञापना पायापाशी ॥१॥
अनाथां जीवांचा तू काजकैवारी । ऐसी चराचरी ब्रिदावळी ॥धृ॥
न संगता कळे अंतरीचे गूज । आता तुझी लाज तुज देवा ॥२॥
आळिकर ज्याचे करिसी समाधान । अभयाचे दान देऊनिया ॥३॥
तुका म्हणे तू चि खेळे दोही ठायी । नसेल तो देइ धीर मना ॥४॥

३३.
नको काही पडों ग्रंथांचे भरी । शीघ व्रत करी हे चि एक ॥१॥
देवाचियें चाडे आळवावे देवा । ओस देहभावा पाडोनिया ॥धृ ॥
साधने घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकी न चुकती ॥२॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासि इच्छा आवश्यक ॥३॥
रोकडी घातला अंगसंगे जरा । आता उजगरा कोठवरि ॥४॥
तुका म्हणे घाली नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥५॥

३४.
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद तो काया । भेद नाही देवा तया ॥धृ॥
आनंदले मन । प्रेमे पझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥३॥

३५.
बहुता छंदाचे बहु वसे जन । नये वांटू मन त्यांच्या संगे ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥धृ॥
सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांती साउली सिणलियाची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथे काय कोड धांवायाचे ॥३॥

३६.
तुम्ही येथे पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥
ता काय पुढे वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥धृ॥
देवाचे उचित एकदश अभंग । महाफळ त्याग करुनि गेला ॥२॥
तुका म्हणे सेवा समर्पूनि पायी । जालो उतराई ठावे असो ॥३॥

३७.
नावडे जे चित्ता । ते चि होसिपुरविता ॥१॥
का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटी ॥धृ॥
न करावा संग । वाटें दुरावावे जग ॥२॥
सेवावा एकात । वाटे न बोलावी मात ॥३॥
जन धन तन । वाटें लेखावे वमन ॥४॥
तुका म्हणे सत्ता । हाती तुझ्या पंढरिनाथा ॥५॥

३८.
काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥
तुम्ही कळलेती उदार । साटी परिसाची गार ॥धृ॥
जीव दिला तरी । वचना माझ्या न ये सरी ॥२॥
तुका म्हणे धन । आम्हा गोमांसा समान ॥३॥


३९.
मुंगी आणि राव । आम्हा सारखाची जीव ॥धॄ॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥धृ॥
सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ॥२॥
तुका म्हणेले । घरा वैकुंठ सगळे ॥३॥

४०.
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी॥१॥
तुमचे येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥धृ॥
कंटी मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥

४१.
पाइकीचे सुख पाइकासी ठावे । म्हणोनिया जीवे केली साटी ॥१॥
येता गोळ्या बाण साहिले भडमार । वर्षता अपार वृष्टी वरी ॥धृ॥
स्वामीपुढे व्हावे पडता भांडण । मग त्या मंडन शोभा दावी॥२॥
पाइकानी सुख भोगिले अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाही ॥३॥
तुका म्हणे या सिध्दांताच्या खुणा । जाणे तो शहाणा करी तो भोगी ॥४॥

४२.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणची देव होय गुरू ॥१॥
पढिये देहभावे पुरवितो वासना । अती ते आपणापाशी न्यावे ॥धृ॥
मागे पुढे उभा राहे साभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योग क्षेम जाणे जड भारी । वाट दावी करी धरूनिया ॥३॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी । पाहावे पुराणी विचारूनी ॥४॥

४३.
मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य | वाटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥१।
द्रव्य वेचावे अन्नसत्रीं भूती द्यावे सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥धृ॥
बीज न पेरावे खडकीं ओल नाही ज्याचे बुडखी । थीता ठके सेखी पाठी लागे दिवाण ॥२॥
गुज बोलावे संताशी पत्नी राखावी जैसी दासी । लाड देता तियेसी वाटा पावे कर्माचा ॥३॥
शुद्ध कसूनि पाहावे वरि रंगा न भुलावे । तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी ते ॥४॥

४४.
याजसाठी वनांतरा । जातो साडुनियारा ॥१॥
माझे दिठावेल प्रेम । बुद्धी होइल निष्काम ॥धृ॥
अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥२॥
तुका म्हणे अहंब्रम्ह । आड ये नेदीं भ्रम ॥३॥

४५.
सद्गुरुरायें कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही ॥१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥धृ॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काही कळहे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा जाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य सागितली खूण माळिकेची ॥५॥
बाबाजी आपले सागितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥६॥
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥


४६.
नाही म्या वंचिला मंत्र कोणापाशी । राहिलो जिवासी धरुनि तो ॥१॥
विटेवरी भाव ठेवियले मन । पाउले समान चिंतीतसे ॥धृ॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनिया कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागे पावले उद्धार । तिही हा आधार ठेविलासे ॥३॥

४७.
नेणे फुकों कान । नाहीकांतीचे ज्ञान ॥१॥
तुम्ही आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥धृ॥
नाही देखिला तो डोळा । देव दाखवू सकळा ॥२॥
चिंतनाच्या सुखे । तुका म्हणे नेणे दु:खे ॥३॥

४८.
आपला यो एक देव करुनी घ्यावा । तेणे विण जीवा सुख नव्हे ॥१॥
ते ती माइकें दु:खाची जनिती । नाही आदिअंती अवसान ॥धृ॥
अविनाश करी आपुलिया ऐसे । लावी मना पिसे गोविंदाच्या ॥२॥
तुका म्हणे एका मरणे चि सरे । उत्तम चि उरे कीर्ती मागे ॥३॥

४९.
माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविले ते चि द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥धृ॥
सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणे धीर केला । तेणे याला गोविले ॥३॥

५०.
हा गे माझा अनुभव । भक्तिभाव भाग्याचा ॥१॥
केला ऋणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥धृ॥
घालोनिया भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥
तुका म्हणे वचन साटी । नाम कंठीं धरोनि ॥३॥

५१.
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरि ॥१॥
ने सहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥धृ॥
सत्ता सकळ तया हाती । माझी कींव काकुलती ॥२॥
तुका म्हणे ठेवी तैसे । आम्ही राहों त्याचे इच्छें ॥३॥

५२.
म्ही घ्यावे तुझे नाम । तुम्हीम्हा द्यावे प्रेम ॥१॥
से निवडिले मुळी । संती बैसोनि सकळी ॥धृ॥
माझी डोई पायारी । तुम्ही न धरावी दुरे ॥२॥
तुका म्हणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥३॥

५३.
संताचिये गांवी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दु:ख लेश ॥१॥
तेथे मी राहीन होवोनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥धृ॥
संताचिये गांवी वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संताचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
संताचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटी घेती देती ॥४॥
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी । म्हणोनि भिकारी जालो त्यांचा ॥५॥

५४.
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियासी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥धृ॥
तुका म्हणे कृपा करील नारायण । तरीच हे वर्म पडे ठायी ॥२॥

५५.
उपदेश तो भलत्या हाती । जाला चित्ती धरावा ॥१॥
नयें जाऊ पात्रावरी । कवटी सारी नारळे ॥धृ॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥

५६.
ता तरी पुढे हा चि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥१॥
सकळाच्या पाया माझे दंड्वत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥धृ॥
हित ते करावे देवाचे चिंतन । करूनिया मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥३॥


५७.
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एक भावे ॥१॥
निघोनि आयुष्य जाते हातोहात । विचारी पा हीत लवलाही ॥२॥
तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥

५८.
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरे सेवन उपकारा । द्यावे द्यावे या उत्तरा ॥धृ॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी ते ऊर्ध ॥२॥
गात जात तुका । हा चि उपदेश आइका ॥३॥

५९.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥धृ॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ॥३॥

६०.
भावे गावे गीत । शुद्ध करूनिया चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरी हा सुलभ उपाव ॥धृ॥
आणिकाचे कानी । गुण दोष मना नाणी ॥२॥
मस्तक ठेंगणा । करी संताच्या चरणा ॥३॥
वेची ते वचन । जेणे राहे समाधान ॥४॥
तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥

६१.
इतुले करी भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
संडुनि अभिलाष अंतरी । वर्ते वेव्हारी सुखरूप ॥१॥
न करी दंभाचा सायास । शंती राहे बहुवस ।
जिव्हे सेवी सुगंधरस । न करी आळ्स रामनामी ॥२॥
जनमित्र होई सकळाचा । अशुभ न बोलावी वाचा ।
संग न धरावा दुर्जनांचा । करी संताचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
तृष्णा अडविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरुनि विश्वास करी धीर । करिता देव हा चि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार । नाही अंतर तुका म्हणे ॥५॥

६२.
जावे बाहेरी हा नाठवे विचार । नाही समाचार ठावा काही ॥१॥
काही न कळे ते कळों आले देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥
कवतुकासाठी भक्त देहावरि । आणिताहे ह्री बोलावया ॥३॥
यासि नाव रूप नाही हा आकार । कळला साचार भक्त्त मुखे ॥४॥
मुखे भक्त्तांचिया बोलतो आपण । अम्गसंगे भिन्न नाही दोघां ॥५॥
दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥६॥
तयासी घडली सकळ ही पापें । भक्तांचिया कोपें निंदा द्वेषें ॥७॥
द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेवी प्राणा नाश करी ॥८॥
करिता आइके निंदा या संताची । तया होती ते चि अध:पात ॥९॥
पतन उद्धर संगाचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥१० ॥
संतसेवी जोडे महालाभरासी । तुका म्हणे यासि नाश नाही ॥११॥

६३.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ॥१॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥धृ॥
पर उपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥२॥
हूतदया गायी पशूचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ॥३॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ॥४॥
तुका म्हणे हे चि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥५

६४.
धर्माचे पाळण । करणे पाषांड खंडण ॥१॥
हे चि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ॥धृ॥
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ॥२॥
नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥

६५.
नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥
कुपथ्य करुनी विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥धृ॥
तुका म्हणे लासूं फांसूं दे डाव । सुखाचा उपाव पुढे आहे ॥२॥

६६.
भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्ही भोग ब्रम्ह तनु ॥१॥
देहाच्या निरसने पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥धृ॥
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकविण एक कामा नये ॥२॥
तुका म्हणे मज केले ते चाचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥३॥

६७.
घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती । मुक्तां आत्मस्थिती सांडवीन ॥१।
ब्रम्हभूत होते कायाच कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ॥धृ
तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडू स्वर्गवास करिन भोग ॥२॥
साडवीन तपोनिधा अभिमान । यद्न्य आणि दान लाजवीन ॥३॥
भक्तिभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ॥४॥
धान्य म्हणवीन येहे लोकीं लोका । भाग्य आम्ही तुका देखियेला ॥५॥

६८.
न देखवे डोळा ऐसा हा आकात । परपीडे चित्त दु:खी होते ॥१॥
काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे ॥धृ॥
परचक्र कोठें हरिदासाच्या वासे । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणे जाले ॥३॥

६९.
बोलतो निकुरे । नव्हेत सलगीची उत्तरे ॥१॥
माझे संतापले मन । परपीडा ऐकोन ॥धृ॥
अंगावरी आलेतोवरी जाईल सोसिले ॥२॥
तुज भक्तांची आण देवा । जरि तुका येथे ठेवा ॥३॥

७०.
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥१॥
कर्म धर्में तुम्हा असावे कल्याण । घ्या माझे वचन आशीर्वाद ॥धृ॥
वाढ्वुनि दिला एकाचियें हाती । सकळ निश्चिंती जाली तेथे ॥२॥
ता मज जाणे प्राणेश्वरासवे । माझिया भावे अनुसरलो ॥३॥
वढविता लोभ होईल उसीर । अवघीच स्थीर करा ठायी ॥४॥
धर्म अर्थ काम जाला एकें ठायी । मेळविला जिही हाता हात ॥५॥
तुका म्हणे आता जाली हेवि भेती । उरल्या त्या गोष्टीं बोलावया ॥६॥

७१.
म्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा संगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवितो॥२॥
अंतकाळी विठो आम्हासि पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥

७२.
अमृताचीळे अमृताची वेली । ते चि पुढे चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियाचा संग देई नारायणा । बोलावा वचन जयाचिया ॥धृ॥
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुश्टी काती तैसी दिसे वरी ॥२॥
तुका म्हणे तैसे होइजेत संगे । वास लागे अंगे चंदनाच्या ॥३॥
*****
 

परिशिष्ट २

 

रामेश्वरभट याचे अभंग

 
७३. (१०७९}

भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरी
ऐसिय़ा अनंतामाजी तू अनंत । लीला वेश होत जगत्राता ॥१॥ ॥धृ॥
ब्रह्मानंद तुके तुळे आलातुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनी ॥ऽ॥
शाखा शिष्ताचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियली।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळि जगधंद्यागिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
सत वृंदे तीर्थ गौतमी हरिकथा ।तुकयानर सिंहस्ता भेटों आली ॥३॥
शाती पतिव्रते जाले परि नयन । काम संतर्पण निष्कामता ।
क्ष्मा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगीं । ते तो तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्व भूते ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्माशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ति विस्तारली । वाक्यें सपळ केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमाने वंचलो । ते मी उपेक्षिलो न पाहिजे
न घडों याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥

७४. (१०८०)

पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परि सरी न पवती तुकयाची ।
शास्त्र ही पुराणे गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यासी ॥१॥।धृ॥
कर्म अभिमाने वर्ण अभिमाने । नादले ब्राम्हण कलियुगीं ॥ऽ॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भाव त्याचा पायी विठोबाचॆं ।
अमृताची वाणी वरुषला शुद्ध । करी त्या अशुद्ध ऐसा कोण॥२॥
चहूं वेदांचे हे केले विवरण अर्थ हि गहन करुनिया ।
उत्तम मध्यम कनिष्ट वेगळे। करुनि निराळे ठेविले ते ॥३॥
भक्तिज्ञाने आणि वैराग्यॆं आगळा । ऐसा नाही डोळा देखियेला ।
जप तप यद्न्य लाजविली दाने । हरिनाम कीर्तने करुनिया ॥४॥
मागे कवीश्वर जाले थोर थोर । नेले कलिवर कोणे सागा ।
म्हणे रामेश्वर सकळा पसोनि । गेला तो विमानि बैसोनिया ॥५॥

७५. (१०८१)

माझी मज आली रोकडी प्रचित । होऊनि फजित दु:ख पावे ॥१॥ ॥धृ॥
काही द्वेष त्यांचा करिता अंतरी । व्यथा या शरीरी बहुत जाली ॥ऽ॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार । स्वप्नीं सविस्तर सागितले ॥२॥
तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर । का जे अवतार नामयाचा ॥३॥
त्याची तुज काही घडली रे निंदा । म्हणोनि हे बाधा घडली तुज ॥४॥
ता एक करी सागेन ते तुला । शरण जाई त्याला निश्चयेशी ॥५॥
दर्शने चि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सागितला ॥६॥
तो चि हा विश्वास धरूनि मानसी । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमॆं । जाले हे आराम देह माझे ॥८॥
७६. (१०८२)

वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकी ॥१॥ ॥धृ॥
ऐशी वेद श्रुति बोलती पुराणेनाही ते दुषण हरिभक्ता ॥ऽ॥
उंच निंच वर्ण न म्हणावा कोणी । जे का नारायणी प्रिय जाले ॥२॥
चहूं वर्णासी हा असे अधिकार । करिता नमस्कार दोष नाही ॥३॥
जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय पूज्यमान सर्वत्रासी ॥४॥
गुरु परब्रम्ह देवांचा तो देव । त्यासी तो मानव म्हणूं नये ॥५॥
म्हणे रामेश्वर नामिं जे रंगले । स्वयें चि ते जाले देवरूप ॥६॥