प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ
   

Font Problem

देहू दर्शन

संकल्पना व छायाचित्र - संदीप आपटे

 

 

विठोबा-रखुमाई

 

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥ 1 ॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ 2 ॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥ 3 ॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥ 4 ॥
उध्दव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥ 5 ॥

    तुकोबांचे आठवे पूर्वज श्रीविश्वंभर बुवा एकनिष्ठ वारकरी होते. महाराष्ट्रात श्रीविठ्ठलाची उपासना एवढी सुंदरतेने प्रज्वलित झाली की, मूळचा हा कानडा विठ्ठल, अगदी प्राकृत मऱ्हाठा होऊन राहिला. भोळेभाळे वारकरी त्या सुंदर ध्यानाकडे पाहता पाहता संसार हरपून त्याच्या भेटीसाठी श्रीनामयाच्या आर्ततेने वारंवार   पंढरीला  येऊ   लागले. विश्वंभर  बुवांनी  देवाला  पाहून  हृदयात  एवढा

साठविला की, विश्वंभराचे घर आणि कुळ सारेच आपलेसे करावे, असे विठ्ठलालाही वाटू लागले. तो विश्वंभर बुवांच्या स्वप्नात जाऊन ‘मी तुझ्याकडेच वस्तीला येतो’ म्हणून ‘आपण आंबियाच्या वनांत झोपलो आहोत’ असा दृष्टांत दिला.विश्वंभरबुवांनी गावकऱ्यासहित तेथे जाऊन हातांनी जागा उकरली. तो बुक्क्याचा सुगंध सुटून तुळशी-फुलेही विखुरलेली आढळली, आणि नंतर हल्लीचे देहूतले श्रीतुकोबारायांच्या प्रीतीतले ध्यान रुक्मिणी मातु:श्रीसह प्रगट झाले. मोठया समारंभाने बुवांनी विठूची प्रतिष्ठापना कुळपूज्य देव म्हणून केली.
                         कर कटी उभा विश्वाचा जनिता। वामांगी ते माता रखुमादेवी॥
हल्लीच्या देवळापूर्वी या मूर्ती तुकोबांच्या पूर्वजांच्या राहत्या घरी होत्या असे समजते. अशा रमणीय स्थळी विश्वंभर बुवांनी आपल्या कुळाची राखण करण्यासाठी स्थिर केला आणि आपण यथाकाल त्याच्या चरणी विलीन झाले.

 

भंडारा

 अंतरीचा रंग उमटेल व सादावील असे तुकोबांचे जीवन होते. त्यांचा दिवसातला पुष्कळसा काळ भंडारा डोंगरावर जात होता .भंडारा हे त्यांचे विशेष आवडीचे ठिकाण होते. दिवसभर तेथे अंगी रस भिनला म्हणजे देवभक्त आणि नाम यांचा संगम असलेल्या कथाकीर्तनरूपाने सकळ जनासहित ते सुख भोगावयाला, वाटावयाला गावात येत. भंडारा व भोवतालच्या परिसरात वृक्षवल्लीच्या सहवासात ते आत्मानंद गात विहरू लागले.

ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥ 1 ॥
तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ 2 ॥
कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥ 3॥
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥ 4 ॥
तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥ 5 ॥

   

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

 
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥2॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवश्वरु॥3॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥4॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
 

तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥5॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

 
   

मंदीर परिक्रमा

   

बहेणाबाई शिऊरकर (इ.स. १६५० ते १७००)

बहेणाबाई देहूला मुक्कामी असता, त्यांनी मंबाजी यांचे शिष्य होण्यास नकार दिल्यावर, मंबाजीने चिडून बहेणाबाईंची कपिला गाय चोरली व घरात ठेवून तिला मारले. कपिला गाईला पाठीवर मारल्याचे वळ तुकोबांच्या पाठीवर उठले. पुढे मंबाजीच्या घरी आग लागली तेव्हा लोकांनी कपिला सोडवून आणली.तुकोबांच्या पाठीवरील वरील वळ व कपिलाच्या अंगावरील वळ सारखेच आहेत हे पाहून रामेश्वर भट यांना गहिवरून आले.

रामेश्वर भटे ऐकिला वृत्तांत । धावोनी त्वरीत तेथे आले ॥ 1 ॥
तुकोबाचे तेही घेतले दर्शन । गाय तेही पूर्ण पाहियेली ॥ 2 ॥
दोहीचा पाठीचा दिसे एक भाव । रूदनी ते सर्व प्रवर्तले ॥ 3 ॥
तुकोबाचा पार वर्णीलसा कोण । कलियुगी जाण प्रल्हाद हा ॥ 4 ॥
सर्वांतर साक्षी करूनिया स्तुती । स्वमुखे रमती आपुलिया ॥ 5 ॥
बहेणी म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ॥ 6 ॥

 

 

गरुड मंदीर

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥ 1 ॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ 2 ॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥ 3 ॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥ 4 ॥
उध्दव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥ 5 ॥
तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥ 6 ॥
 
 

हनुमान मंदीर

हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥1॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥

करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥2॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥

जाळीयेली लंका । धन्य धन्य ह्मणे तुका ॥3॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
 

प्रायश्चित्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥1॥
धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥

निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥2॥
धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥

तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥3॥
धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥

बुडविल्या वह्या बैसलो धरणे

तूं कृपाळू माउली आह्मां दीनांची साउली ।
न संरित आली बाळवेशें जवळी ॥ 1 ॥
माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण ।
निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ ध्रु. ॥

कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं ।
कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें ॥ 2 ॥
माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण ।
निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ ध्रु. ॥

तुका ह्मणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आई ।
आतां पुढें काई तुज घालूं सांकडें ॥ 3 ॥
माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण ।
निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ ध्रु. ॥

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला ।
जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥ 1 ॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन ।
झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ ध्रु. ॥

अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें ।
योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥ 2 ॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन ।
झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ ध्रु. ॥

उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद ।
तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥ 3 ॥
भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन ।
झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ ध्रु. ॥
 

सौजन्य : श्रीतुकाराम देवस्थान, श्री क्षेत्र देहू.